ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने दहा वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू
पाचोरा (प्रतिनिधी); -ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने दहा वर्षीय बालक ठार झाल्याची घटना शहरातील भडगाव रोडवरील शक्ती धाम जवळ 13 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुद्र जितेंद्र गोसावी वय 10 असे मयत बालकाचे नाव आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहरातील राजीव गांधी कॉलनीत जितेंद्र गोसावी हे आपल्या पत्नी दोन मुले व आईसह राहिला असून त्यांचा तिसरी मध्ये शिकणारा रुद्र गोसावी हा पिके शिंदे माध्यमिक विद्यालयात शिकायला असून 13 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर रुद्र शक्ती हंजवळ सायकलवर खेळण्यासाठी केला असता भरता वेगाने आलेल्या ट्रॅक्टर पाहून तो ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकांमध्ये सापडल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाला. चिमुकल्याचा मृतदेह पाहून त्याच्या आई-वडिलांनी मोठा आक्रोश केला. त्याला पाचोरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या घटने प्रकरणी जितेंद्र गोसावी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर चालक विजय उर्फ बबलू अशोक थोरात रा पुनगाव ता. पाचोरा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे करीत आहे