पद्मविभूषण रतनजी टाटा काळाचा अस्त, ८६ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास!
महा पोलीस न्यूज । दि.१० ऑक्टोबर २०२४ । प्रसिद्ध उद्योगपती, भारतीय उद्योगाचा महामेरू, टाटा सन्सचे मानद अध्यक्ष आणि टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष भारतरत्न रतन टाटा यांनी मुंबईतील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात वयाच्या ८६ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. उपचार सुरू असताना बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.
भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना रविवार दि.६ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर टाटा यांनी सोमवार दि.७ ऑक्टोबरला दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. ‘माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही’, असं रतन टाटा म्हणाले होते.
रतन टाटा यांना दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली. आयसीयूत दाखल असताना त्यांचे निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून देशाचे मोठे नुकसान झाले आहे.