पहेलगाम हल्याच्या निषेधार्थ श्री परशुराम जन्मोत्सव शोभायात्रेतून हजारोंच्या संख्येने केला जाणार विरोध

महा पोलीस न्यूज । दि.२६ एप्रिल २०२५ । भगवान परशुराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी मागील 2 महिन्यांन पासून कार्यकत्यांच्या अहोरात्र परिश्रमाने पूर्णत्वास आली आहे. दरम्यान पहेलगाम येथे धर्म विचारून २६ हिंदूंची हत्या केली. या आंतकवादबाबत समस्त हिंदूमध्ये प्रचंड आक्रोश आहे. निष्पाप पर्यटकांचे निर्दयतेने झालेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर जन्मोत्सव शोभायात्रेत काही बदल करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
बहुभाषिक ब्राहमण संघाच्या वतीने पोलीस मल्टी पर्पज हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, विद्यमान अध्यक्ष प्रतिथयश वास्तू विशारद नितीन पारगावकर, महिला संघाच्या अध्यक्षा वृंदा भालेराव, प्रसिध्दी प्रमुख मनीष पात्रीकर, सचिव राजेश नाईक, सचिव अजंली हांडे, पंकज पवनीकर, सुरेंद्र मिश्रा, तुषार देशपांडे, परेश पाठक उपस्थित होते.
आयोजकांनी सांगितले की, प्रती वर्षीप्रमाणे शोभायात्रा वाजत गाजत न निघता ढोल-ताशे बंद ठेवून “ढोल नहीं अब तोफ बजेगी, प्रतिशोध की आग जलेगी” धर्म पूछ कर मारा था अब धर्म बताकर मारेंगे’ अशा घोषणाचे फलकांसह घोषणा देत, हजाटोंच्या संख्येने डोक्याला काळे फित बांधून कोणतेही वाद्य न वाजवता शोभायात्रा नेताजी सुभाष चंद्र बोस चौक ते शास्त्री टॉवरमार्ग नेहरू चौकपर्यंत निघणार आहे. या शोभायात्रेमध्ये समाजातील बहुसंख्येने ज्ञाति बंधू भगिनीनी एकजूट दाखवून प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष अर्की.नितीन पारगांवकर व महिला अध्यक्ष वृंदा भालेराव यांनी केले आहे.
५ हजार समाज बांधव उपस्थित राहणार
शोभायात्रा खान्देश सेंट्रल लॉन येथे पोहचल्यावर समापना वेळी प्रतिवर्ष अनुरूप परम पवित्र भगव्या ध्वजास डोल वादनाने मानवंदना दिली जाईल. यानंतर भगवान परशुराम प्रार्थना होवून ह.भ.प. दादामहाराज जोशी यांचे आशिर्वचनानंतर भगवान श्री परशुरामाची महाआरती होईल. या निमित्त ५ हजार जाति बांधवांकरीता महाप्रसादाने समापन होणार आहे.
रक्तदान शिबीर, दुचाकी रॅली
यंदा जन्मोत्सवात रविवार, दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. स्व.बलदेव उपाध्याय फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर पोलीस मल्टी पर्पज हॉल येथे सकाळी ८ ते ११ पर्यंत आयोजित केले आहे. जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. सांय. ५ वा. महाबळ चौकातुन विराट मोटर सायकल रॅली पहेलगाम आतंकवादी हल्याच्या निषेधार्थ घोषणा देत निघणार आहे. दुचाकी रॅलीमध्ये देखील हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यत आलेले आहे.
९ तालुक्यांना देणार परशुरामांच्या कायम स्वरूपी मुर्ती
जिल्हाभरात देखील परशुराम जन्मोत्सव साजरे व्हावे म्हणुन यंदा ९ तालुक्यांना भगवान परशुरामांच्या कायम स्वरूपी मुर्ती देण्यात येऊन जिल्ह्यात सर्व ठिकाणी देखील भव्य शोभायात्रेचे आयोजनात आतंकवादी हल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी दिली.