पोलिस कर्मचाऱ्याकडूनच वीजचोरी; धुळ्यात गुन्हा दाखल

पोलिस कर्मचाऱ्याकडूनच वीजचोरी; धुळ्यात गुन्हा दाखल
धुळे: शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, कायद्याचे रक्षण करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यानेच वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. या धक्कादायक घटनेनंतर महावितरणच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस मुख्यालयाच्या इमारतीत राहणारे पोलीस कर्मचारी शैलेश जाधव यांनी वीज मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचे महावितरणच्या तपासणीत उघड झाले. महावितरणचे सहायक अभियंता श्रेयश बन्सोड यांच्या तक्रारीनुसार, जाधव यांनी १४ नोव्हेंबर २०२४ ते ३० जुलै २०२५ या कालावधीत तब्बल ३११ युनिट्सची वीज चोरली. या चोरीच्या विजेची किंमत ६ हजार ५३२ रुपये इतकी आहे.
महावितरणने जाधव यांना तडजोडीसाठी २ हजार रुपये भरण्याची नोटीस दिली होती, परंतु त्यांनी ती रक्कम भरण्यास नकार दिला. अखेरीस, महावितरणने पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.






