Detection

टायमर लावून वाहन जाळणाऱ्याला शहर पोलिसांनी ५ तासात पकडले

महा पोलीस न्यूज । दि.९ नोव्हेंबर २०२४ । जळगाव शहरात टायमर लावून मालवाहू वाहन पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. छत्रपती शिवाजी महाराज नगरात घडलेल्या प्रकाराची चौकशी केली असता अवघ्या ५ तासात पोलिसांनी गुन्हा उघड केला आहे. व्यावसायिक वादातून हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात मुख्य चौकात राहणारे सलीम बशीर खान यांचे वाहन क्रमांक एमएच.०३.इजी.३०९९ आहे. वाहनातून नेहमी औषधी आणि इतर साहित्याची वाहतूक केली जाते. वाहन चालक सलीम खान बशीर खान यांनी गुरुवारी दि.७ रोजी वाहनात माल भरला होता. शुक्रवारी सकाळी ते पाचोरा जाण्यासाठी निघाले असताना उड्डाणपुलाजवळ अचानक वाहनातून धूर दिसू लागला.

वाहन उघडून पाहिले असता त्यात एका खोक्यात काही फटाके, सुतळी बॉम्ब, पेट्रोल भरलेल्या बाटल्या, फॅन्सी टायमर बॉम्ब असे साहित्य होते. आगीमुळे वाहनातील सामान जळले असून लागलीच आग विझवण्यात आली. आग नेमकी कुणी लावली आणि त्यांचा उद्देश काय याबाबत पोलीस तपास करीत असताना जळगाव शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात संशयिताला पकडले.

व्यावसायिक वादातून केले कृत्य
सलीम बशीर खान हे राणे ट्रान्सपोर्ट यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते. वर्षभरापूर्वी त्यांनी स्वतःचे ट्रान्सपोर्ट सुरू केले. व्यावसायिक स्पर्धा वाढल्याने धीरज जितेंद्र राणे, वय-२८ रा.भुसावळ याने वाहन जाळण्याचा कट रचला. भुसावळहून सर्व साहित्य खरेदी करीत त्याने ते पार्सल वाहनात ठेवले. रात्री २.१२ च्या सुमारास दुचाकीवर येऊन त्याने रिमोटमने कोल्ड फायर फटाके जाळले. काही वेळाने वाहनाला आग लागली. पोलिसांनी माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचा अंदाज घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक रामचंद्र शिखरे, पोलीस उपनिरीक्षक राजीव जाधव, महेश धायताड, भरत पाटील, पोलीस कर्मचारी योगेश पाटील, अमोल ठाकूर, नरेंद्र ठाकरे, सुधीर साळवे, दत्ता पाटील, शिवाजी धुमाळ, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धंडे, राजू जाधव, उमेश भांडारकर, किशोर निकुंभ, प्रणव पवार आदींचा समावेश होता.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button