लोकसभा निवडणूक निकालासाठी पोलीस प्रशासन सज्ज!

महा पोलीस न्यूज | २ जून २०२४ | लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. मतमोजणी ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जळगाव जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले असून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघ आणि रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून दि.४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. दोन्ही मतदार संघातील मतमोजणीला सकाळी ८ वाजेपासून वखार महामंडळाच्या गोदाम येथे सुरुवात होणार आहे.
मतमोजणी ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यात २ उपविभागीय पोलीस अधिकारी, ४ पोलीस निरीक्षक, २२ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, ४०० पोलीस कर्मचारी, ३ आरसीपी प्लॅटून, २ एसआरपी प्लॅटून, २ सीआरपीएफ तुकड्या तैनात असणार आहे. सर्व घडामोडींवर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक लक्ष ठेवून असणार आहेत.