मोठी बातमी : नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाचा यादी..
महा पोलीस न्यूज | २३ फेब्रुवारी २०२४ | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलीस पात्र असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. अनेक जिल्ह्यात नियम डावलून बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती मात्र गुरुवारी आयोगाने त्यावर हरकत घेत तात्काळ बदलीचे आदेश दिले होते. अखेर शुक्रवारी नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पारित केले आहेत. जळगाव जिल्ह्यातील ३ पोलीस निरीक्षकांचा त्यात समावेश आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काढलेल्या आदेशानुसार,
ज्योती चंद्रकांत गडकरी अहमदनगरहून नाशिक ग्रामीण, विजय मारुती करे अहमदनगरहून नाशिक ग्रामीण, राजेंद्र दामोदर कुटे नाशिक ग्रामीणहून जळगांव, रविंद्र गुणवंतराव मगर नाशिक ग्रामीणहून अहमदनगर, जयपाल माणिकराव हिरे जळगांवहून धुळे, ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव जळगांवहून नाशिक ग्रामीण, दिपक किसनराव बुधवंत नंदुरबारहून जळगांव, भरत दत्तात्रय जाधव नंदुरबारहून अहमदनगर, अशोक कचरु पवार नाशिक ग्रामीणहून जळगांव, बापुसाहेब शांताराम महाजन नाशिक ग्रामीणहून नंदुरबार, शाम काळु निकम नाशिक ग्रामीणहून नंदुरबार, पांडुरंग विठ्ठल पवार नाशिक ग्रामीणहून जळगांव, शिल्पा गोपीचंद पाटील जळगांवहून नाशिक ग्रामीण, अजय तानाजी वसावे नंदुरबारहून नाशिक ग्रामीण अशा बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षकांसह परिक्षेत्रातील १३ सहाय्यक निरीक्षक तर ३२ पोलीस उपनिरीक्षककांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.