Other
धक्कादायक : पोलीस पाल्याने गळफास घेत संपवले जीवन
महा पोलीस न्यूज | ९ एप्रिल २०२४ | जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदाराच्या मुलाने राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार रफिक गफुर तडवी हे बॉम्बे टाईप पोलीस वसाहतीत खोली क्रमांक ५ मध्ये राहत होते. मंगळवारी सकाळी ११.४५ वाजेच्या अगोदर राहत्या घरी त्यांचा मुलगा सोहेल रफिक तडवी वय – २५ वर्ष याने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील सीएमओ डॉ.निरंजन देशमुख यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर करीत आहेत.