Crime

धक्कादायक, रक्षकच बनला भक्षक :  बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाचा 5 वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग

पुणे वृत्तसंस्था :- खाकी वर्दीला काळीमा फासणारी घटना बुधवारी नाताळाच्या दिवशी मावळ तालुक्यातील लोहगड विसापूर किल्ला परिसरामध्ये घडली आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सचिन सस्ते असे या पोलिसाचे नाव असून त्याच्याविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात  पोक्सो, ॲट्रासिटी व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर सुट्टीच्या अनुषंगाने लोक फिरण्यासाठी येतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर किल्ल्यावर पुणे ग्रामीण हेडक्वार्टर येथून अधिकचा बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामध्ये पोलीस सचिन सस्ते हा देखील विसापूर किल्ला परिसरात बंदोबस्तावर होता.

विसापूर किल्ला पाहण्यासाठी पाच वर्षीय चिमुकली तिच्या आई-वडिलांसोबत आली होती. त्या चिमुकलीला सचिन सस्ते याने चॉकलेटचा आमिष दाखवले आणि आडोशाला नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पोलीस सचिन सस्ते याला अटक केली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button