Crime

दिवसाढवळ्या मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपीला अटक

अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई

अमळनेर | पंकज शेटे : शहरात भर दिवसा घडलेल्या मोटरसायकल चोरीचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे. राजेंद्र रतनलाल वर्मा यांच्या घरासमोरून चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केली असून, या चोरीच्या प्रकरणात विजय भाईदास भील (वय १९, रा. एकरुखी, ता. अमळनेर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी दुपारी १:३० ते २:०० वाजण्याच्या सुमारास राजेंद्र वर्मा जेवणासाठी घरी आले होते. त्यांनी आपली मोटरसायकल (क्रमांक MH १९ AF ४२५५) घरासमोर हँडल लॉक करून उभी केली होती. मात्र, काही वेळातच अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. या घटनेनंतर वर्मा यांनी तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तपास पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने (पोलीस कॉन्स्टेबल अशोक साळुंखे, मिलिंद सोनार, विनोद भोई, निलेश मोरे, विनोद संनदानशिव, उदय बोरसे) तपासाला सुरुवात केली.

या पथकाने तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारे विजय भाईदास भील याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी एकरुखी येथील त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेतले आणि अटक केली.

चोरीची मोटरसायकल हस्तगत

पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. त्याने ती मोटरसायकल डुबकी मारुती मंदिर परिसरातील झुडपांमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणाहून ती मोटरसायकल जप्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करत आहेत.

पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शन

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेतकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक होते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे.

नागरिकांना आवाहन – या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक निकम यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, आपली मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरासमोर, कार्यालयात किंवा गोदामात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. तसेच, मोटरसायकलला नेहमी हँडल लॉक लावण्यासोबतच शक्य असल्यास अतिरिक्त लॉकचा वापर करावा.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button