देशी बनावटीच्या पिस्तुलासह दोन जिवंत काडतूस हस्तगत, एकाला अटक

देशी बनावटीच्या पिस्तुलासह दोन जिवंत काडतूस हस्तगत, एकाला अटक
पुसद पोलिसांची कारवाई
पुसद प्रतिनिधी
पुसद पोलीस यांना मिळालेल्या माहितीनुसार
प्रभा पेट्रोल पंपा समोर वाशिम रोड येथे एकाकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
आरोपी देव दिलीप श्रीरामे, वय २० वर्षे, रा. शिवाजी वार्ड, पुसद ह्याचेजवळ देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आले. त्यांचेवर कलम 3, 25 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद सदर करण्यात आला.
ही कारवाई कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, . पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ व हर्षवर्धन बी. जे., सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद यांचे मार्गदर्शनात सतीश जाधव, पोलीस निरीक्षक, पोस्टे. वसंतनगर, पुसद, पोउपनिरीक्षक योगेश जाधव, Hc अशोक चव्हाण, मुन्ना आडे, सतीश शिंदे व संजय पवार यांनी केली.