नवरात्रोत्सवात सोने-चांदीच्या भावाने गाठला नवा उच्चांक; वाचा आजचा दर
दिवाळी व लग्नसराईच्या खरेदीसाठी ग्राहकांचा भंगाळे गोल्डकडे ओढा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचत असताना सोनं-चांदीच्या दरात दररोज वाढ होत आहे. भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) यांच्या माहितीनुसार सोन्याने आज पुन्हा भावात उडी घेतली असून, दिवाळी व आगामी लग्नसराईच्या खरेदीचा हंगाम लक्षात घेता ग्राहक मोठ्या संख्येने दालनांकडे वळत आहेत.
आजच्या दरांनुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,०४,६९०, तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,१४,३०० इतके झाले आहे. दरम्यान, चांदीचा दर ₹१,३६,००० प्रति किलो झाला असून, या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे.
नवरात्रानंतर दिवाळी आणि लग्नसराईचा हंगाम सुरू होत असल्याने सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. पारंपरिकरीत्या या काळात दागिन्यांची खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे गुंतवणूक तसेच अलंकार खरेदी दोन्ही हेतूंनी बाजारपेठेत खरेदी वाढली आहे.

भंगाळे गोल्डमध्ये या उत्सवी काळात ग्राहकांसाठी आकर्षक योजना, नवीन डिझाईनचे दागिने आणि शुद्धतेची हमी उपलब्ध आहे. सोनं-चांदीच्या भावातील वाढ असूनही विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि आकर्षक ऑफर्समुळे ग्राहक भंगाळे गोल्डला प्राधान्य देत आहेत.




