Other

शेतकऱ्यांची अवहेलना केल्याच्या निषेधार्थ भाजप आमदार बबन लोणीकर  यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

शेतकऱ्यांची अवहेलना केल्याच्या निषेधार्थ भाजप आमदार बबन लोणीकर  यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

जळगाव – शेतकऱ्यांची अवहेलना करणाऱ्या भाजपचे आमदार बबन लोणीकर यांच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पुतळा दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा तीव्र शब्दांत समाचार घेण्यात आला.

महायुती सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीआधी दिलेली कर्जमाफीची आश्वासने अद्याप पूर्ण केली नसताना, त्यांच्या सरकारमधील आमदार बेताल वक्तव्य करून शेतकरी व त्यांच्या कुटुंबाचा अवमान करत आहेत. अशा आमदारांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री डोळेझाक करून समर्थन करत असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

या सरकारला सत्तेचा गर्व झाला असून, शेतकरी राजाला कमी लेखण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी सांगितले. लोणीकर यांनी तात्काळ शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा शिवसेनेतर्फे महायुती सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि ‘अंत्ययात्रा’ काढावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख उमेश पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, माजी शहर संघटक प्रमुख राजूभाऊ पाटील, महिला महानगर प्रमुख मनीषाताई पाटील, विभागप्रमुख विजय बांदल, विजय राठोड, जितेंद्र बारी, रुपेश पाटील, भैय्या वाघ, किरण ठाकूर, सचिन चौधरी, बापू मोणे, सतीश मोरे, दीपक पवार, मयूर गवळी, अंकित कासार, अनिल गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button