Politics

ईश्वर कॉलनीत दिवाळी, आ. राजूमामा भोळेंचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत

तरुणींनी घेतली आमदारांसोबत सेल्फी

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील ईश्वर कॉलनीत जळगाव शहर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत, फुलझाडी, फुलबाज्या उडवित दिवाळी साजरी करीत नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी जेष्ठ नागरिकांनी आ. भोळे यांना विजयासाठी भरभरून आशीर्वाद दिले.

रविवारी दि. १० रोजी दुसऱ्या टप्प्यात ईश्वर कॉलनीतील कृपाळू साईबाबा मंदिर येथे पूजा व आरती करून आ. भोळे यांनी प्रचाराला सुरुवात केली. ईश्वर कॉलनी, लक्ष्मी नगर, सम्राट कॉलनी, जोशी कॉलनी, नाथवाडा, नवल कॉलनी, सिंधी कॉलनी मार्गे पूज्य समाधा आश्रम येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीत जेष्ठ नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून आ. राजूमामा भोळे यांना भरभरून आशीर्वाद दिले. अनेक तरुणांनी तर शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.

ईश्वर कॉलनीत एका तरुणीने आ. राजूमामा भोळे यांच्यासोबत “सेल्फी”घेण्याचा मोह आवरता आला नाही. शिवसेनेचे माजी नगरसेवक रेश्मा काळे, गोपाल पोपटानी, विनय केसवानी, अशोक मंधान आदींच्या घरी आ. भोळे यांनी भेट देऊन चर्चा केली. “आपला माणूस, आपला आधार, राजूमामाच आमदार” या शीर्षकाखाली एका भगिनीने काढलेली रांगोळी रॅली मार्गात लक्ष वेधून घेत होती.

रॅलीत माजी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मंडळ क्रमांक ७ चे अध्यक्ष गोपाल पोपटानी, सचिव विनय केसवानी, माजी नगरसेवक मनोज आहुजा, रेश्मा काळे, रजनी अत्तरदे, भगत बालाणी, शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड.दिलीप पोकळे, गणेश सोनवणे, ज्योती चव्हाण, भाजपाचे सुरेश लुल्ला, आशु रावलानी, हेमंत जोशी, विकी चौधरी, सोनू वैष्णव, प्रसन्ना बागल, दीपक जोशी, उषा परदेशी, विवेक नाथानी, विकी सोनार, ज्ञानेश्वरी कांडेलकर, दिनेश प्रजापत, शरद बाविस्कर, नंदिनी दर्जी, राजेश मलिक, गुरुबक्ष जाधवानी, शिवसेनेचे शोभाताई चौधरी, स्वप्नील परदेशी, राहुल नेतलेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साजिद पठाण, इम्रान पिंजारी, अर्चना कदम, ममता तडवी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, अक्षय मेघे, विजय चव्हाण, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button