महाराष्ट्रातील गुजर उपजातींना OBC यादीत समाविष्ट करण्याचा तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मागणी

महाराष्ट्रातील गुजर उपजातींना OBC यादीत समाविष्ट करण्याचा तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मागणी
नवी दिल्ली प्रतिनिधी
केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री मा. डॉ. वीरेंद्र कुमार यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, सूर्यवंशी गुजर आणि बडगुजर या समाजगटांना केंद्र सरकारच्या इतर मागासवर्गीय (OBC) यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील हे समाजगट प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास असून गुजर समाजाच्या उपजातींमध्ये येतात. केंद्र सरकारच्या ओबीसी यादीत समाविष्ट झाल्यास या समुदायांना सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने अनेक लाभ मिळू शकतात. महाराष्ट्र शासनाने या जातिगटांचा समावेश करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे (NCBC) शिफारस केली होती. त्यामध्ये लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, सूर्यवंशी गुजर आणि बडगुजर या समाजगटांचा “डोडे गुजर, दोरे गुजर” यांच्यासह OBC यादीमध्ये समावेश करण्यात यावा.
८ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या एनसीबीसीच्या बैठकीत या प्रस्तावासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या समाजगटांचा समावेश त्वरित व्हावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार तातडीने निर्णय घ्यावा, यांच्याकडे केली आहे.