Other

रावेरमध्ये गोडाऊनमध्ये चोरी; ४८ हजारांचा माल लुटला

रावेरमध्ये गोडाऊनमध्ये चोरी; ४८ हजारांचा माल लुटला

रावेर | प्रतिनिधी
रावेर शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील ‘नारायणी सेल्स’ या गोडाऊनमध्ये अज्ञात चोरांनी शटरचे कुलूप फोडून सुमारे ४८ हजार ३०० रुपयांचा माल चोरला. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

चोरीची घटना २४ ते २६ मे दरम्यान घडली असून, चोरांनी गोडाऊनचे शटर उघडून आत शिरून कॅडबरी चॉकलेट्स, ५ स्टार बॉक्स, एक मोबाइल फोन, डीव्हीआर यंत्रणा आणि वायफाय राऊटर यांसारखी वस्तू चोरली. हे गोडाऊन उज्वल ओमप्रकाश अग्रवाल यांच्या मालकीचे आहे.

या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून, अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या देखरेखीखाली तपास चालू आहे. शहरात अलीकडे चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत, यामुळे सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button