Crime

गिरणा नदी पुलावरून पडून अनोळखी युवकाचा मृत्यू

ओळख पटविण्याचे पोलिसांनी केले आवाहन

जळगाव :- महामार्गावर असणाऱ्या बांभोरी येथील गिरणा नदीच्या पुलावरून खाली पडल्याने एका अनोळखी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दहा रोजी सायंकाळी उघडकीस आली असून या युवकाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. घटनेची माहिती घटनास्थळी तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन

अनोळखीचा युवकाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. मृत युवकाने अंगात पिवळा रंगाचा टी शर्ट परिधान केला असुन त्याची दाढी  आहे. अनोळखी युवकाची ओळख पटवून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोहेकॉ अनिल फेगडे हे करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button