जळगांव – वसुनंदिनी फौंडेशन आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ॲड. मुकुंदराव जाधव यांना साहित्य रत्न २०२४ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध वकील ॲड. अविनाश भिडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
तसेच ॲड. मुकुंदराव जाधव यांच्या “फुलला सुगंध प्रेमाचा” या दुस-या काव्यसंग्रहाला “उत्कृष्ट काव्यसंग्रह” पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास देशपांडे यांच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमास मुख्य आयोजिका जेष्ठ समाजसेवका माधुरी कुलकर्णी, मान्यवर अतिथी माऊली फौंडेशनचे अध्यक्ष सुरेश मुळे, सुप्रसिद्ध गायक डाॅ. प्रकाश जोशी, जेष्ठ पत्रकार दिलीप दिक्षीत, सुप्रसिद्ध लेखिका सुचिता कुनघटकर, सुप्रसिद्ध लेखक अशोक पारधे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
ॲड. मुकुंदराव जाधव यांचा “मनाच्या नजरेतून…” हा पहिल्या काव्यसंग्रहास देखील “उत्कृष्ट काव्यसंग्रह” पुरस्कार मिळालेला आहे. यापूर्वी त्यांना मराठी साहित्य मंडळ, ठाणे यांचा सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच गझल मंथन साहित्य संस्थेचा “गझलप्रेमी – २०२३” हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ते गेल्या २४ वर्षांपासून जळगांव येथिल जिल्हा न्यायालयात वकीली व्यवसाय करीत आहेत.