संविधानाचे जतन करणे हीच संविधानकर्त्यांना खरी आदरांजली – प्रा. अशोक राणे
जळगाव -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉं. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त के. सी. ई. शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास प्राचार्य अशोक राणे, उपप्राचार्य केतन चौधरी, सर्व शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक राणे होते. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षांनी संविधान कारांनी घेतलेली मेहनत विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिली. या शतकात या संविधानाचे संवर्धन करण्याची जबाबदारी ही आजच्या तरुण पिढीवर आहे हे त्यांनी सांगितले. उपप्राचार्य केतन चौधरी सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित न राहता सर्वांसाठीच होते हे सांगितले. महाविद्यालयातील प्रा. संभाजी जमदाडे यांनी सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर याबद्दल माहिती दिली. जगाच्या ज्ञानवेशीवर ज्ञानतीर्थ म्हणून हा पुतळा उभा आहे आणि सर्व भारतीयांसाठी ती अभिमानाची बाब आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या समन्वयीका प्रा. कुंदा बाविस्कर यांनी प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात त्यांनी महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ सांगून तो फक्त तथागत गौतम बुद्ध व त्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच वापरला गेला हे अधोरेखित केले. महाविद्यालयातील विद्यार्थी अल्ताफ तडवी व चंद्रशेखर वळवी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीक्षा सोनवणे हिने केले, तर उपस्थितांचे आभार पटले राजेंद्र या विद्यार्थ्याने मानले.