सप्तश्रृंगीगड यात्रेकरूंना मोफत भोजन व वैद्यकीय सेवा; ३० वर्षांची सातत्यपूर्ण सेवा
७ ते १० एप्रिल दरम्यान विठेवाडी येथील दत्तमंदिरात सेवा उपलब्ध

सप्तश्रृंगीगड यात्रेकरूंना मोफत भोजन व वैद्यकीय सेवा; ३० वर्षांची सातत्यपूर्ण सेवा
७ ते १० एप्रिल दरम्यान विठेवाडी येथील दत्तमंदिरात सेवा उपलब्ध
धुळे | प्रतिनिधी
वणी येथील सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या हजारो भाविकांच्या सोयीसाठी विठेवाडी येथील दत्तमंदिरात मोफत भोजन, वैद्यकीय सेवा आणि मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ७ एप्रिल ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत या सेवांचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
शिवसेना धुळे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे हे या उपक्रमाचे आयोजक असून, गेल्या ३० वर्षांपासून ते मित्रपरिवाराच्या सहकार्याने ही सेवा अखंडपणे पुरवित आहेत.
विठेवाडी हे ठिकाण लोहणेर-ठेंगोडेच्या पुढे असून, देवीच्या गडाकडे पायी जाणाऱ्या भाविकांसाठी हे महत्त्वाचे विश्रांतीस्थान ठरते. लोहणेर ते कळवण या मार्गावर हॉटेल्सची वानवा असल्याने भाविकांची अडचण होते. त्यामुळे दाट झाडी असलेल्या मंदिर परिसरात विश्रांती आणि भोजनाची सोय मोठा दिलासा ठरते.
वैद्यकीय सेवा उपलब्ध
डॉ. विलास बिरारीस, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. विरेंद्र गिरासे, डॉ. शकील देशमुख, डॉ. भरत पाटील, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. मनिष वडनेरे, डॉ. मनोज जैन, डॉ. नितीन पाटील, डॉ. रविंद्र पाठक, डॉ. जितेंद्र पाटकर, डॉ. नितीन अमृतकर, डॉ. राहूल वाघ, डॉ. प्रशांत सोनवणे, कपील लिंगायत, राहूल वाघ इत्यादी डॉक्टरांची टीम तैनात राहणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवार, ७ एप्रिल २०२५ रोजी होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख अशोक धात्रक, धुळे लोकसभा खासदार शोभाताई बच्छाव, उपनेत्या शुभांगी पाटील, माजी आमदार अनिल गोटे, प्रा. शरद पाटील, पंडीतराव निकम (देवळा), अतुल आहेर, योगेश आबा, नानासाहेब जाधव, प्रकाश पाटील (सावकी), रमेश शिरसाठ (कळवण), धनंजयराव शेडगे (पुणे), हेमंत साळुंखे, भगवान करनकाळ, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, भारत मोरे, दीपक सोनवणे (सटाणा), राजेंद्र जाधव, किरण हांडे, मंगेश पवार, छोटू पाटील, निंबाजी मराठे यांचा सहभाग असणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन भावसार, हंसराज पाटील, बबलु सोनवणे, आबा कापडे, विनोद जगताप, राजेंद्र गुळवे, कैलास वाघारे, आबा हरळ, गजेन्द्र पाटील, आनंद जावडेकर, निलेश कांजरेकर, अनिल शिरसाठ, चेतन भामरे, राजू महाराज, नाना शेलार, अतुल चौधरी, तुषार गवळी, समाधान खैरनार, आबासाहेब जाधव, राजेंद्र चव्हाण, संदीप सोनार, निलेश चव्हाण, गजेंद्र मोरे, वैभव पाटील, शाम मराठे, महादू गवळी, बापू नेरकर, सतीश काळे, संजय पाटील, नितीन देशमुख, किशोर वाघ यांसह अनेक कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.