Detection

गावठी कट्ट्यासह दोघे शनिपेठ पोलिसांच्या जाळ्यात

महा पोलीस न्यूज । २० जुलै २०२४ ।जळगाव शहरासह परिसरात गावठी कट्टा घेऊन एक तरुण फिरत असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचत तरुणाला ताब्यात घेतले. तसेच चौकशी केली असता कट्टा दिलेल्या मित्राचे नाव समोर आल्याने त्याला देखील अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील नेरी नाका परिसरामध्ये संशयित आरोपी गणेश हिमंत कोळी (वय-२३, रा.धानोरा ता. चोपडा जि. जळगाव ह.मु. मोहाडी ता. जळगाव ) हा हातात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोउनि चंद्रकांत धनके व पोकॉ अनिल कांबळे, पोकॉ मुकुंद गंगावणे, पोकॉ विकी इंगळे, पोकॉ रविंद्र साबळे, पोकॉ अमोल वंजारी यांनी संशयित आरोपी गणेश कोळी याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या गावठी कट्ट्याबाबत विचारपुस केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गावठी कट्टा मित्र विनय जितेंद्र कोळी याच्याकडे दिला असल्याचे सांगितले.

पोलिसांनी लागलीच मोहाडी शिवारातील उमेश पार्क येथील शेतात जाऊन गोठ्यातून गावठी कट्टा जप्त केला आहे. तसेच गणेश कोळी यास मदत करणाऱ्या विनय जितेंद्र कोळी वय-३४, रा.मोहाडी ता.जि.जळगाव याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अनिल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button