
भडगाव, प्रतिनिधी –शिवसेना-युवासेना आणि स्व. बापुजी युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव शहर व तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि करिअर मार्गदर्शन शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. फाउंडेशनचे संस्थापक लखीचंद पाटील यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात इयत्ता १०वी व १२वीमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर महाराष्ट्रभर आपल्या प्रभावी वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेले प्रा. विठ्ठल कांगणे सर यांचे करिअर मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये आमदार किशोर आप्पा पाटील, नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पी.ए. पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भैय्यासाहेब पाटील, समन्वय समिती अध्यक्ष युवराज पाटील, प्रवक्ते प्रदीप देसले, उपजिल्हाप्रमुख डॉ. विशाल पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, तालुकाप्रमुख समाधान पाटील, शहरप्रमुख बबलू देवरे, तसेच शिवसेना-युवासेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात त्यांच्या पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व परिश्रमाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून पाचोरा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ. सुनिताताई किशोर पाटील यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पिंटू मराठे, निलेश पाटील, महेंद्र ततार, जहांगीर मालचे, बबलू पाटील, चेतन राजपूत, भोला पाटील, भुरा पाटील, प्रथमेश पाटील, प्रशांत सोनवणे, हर्षल राजपूत, किशोर राजपूत, राहुल कासार, स्वप्नील परदेशी, संजय गंजे, सोनू गंजे आदींनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रवीण महाजन सर यांनी प्रभावीपणे पार पाडले.