CrimeDetection

शाहूनगरातील चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

पँटच्या खिशातून १२ हजार ५०० रुपये लंपास; तीन संशयित ताब्यात, १२ हजारांची रोकड हस्तगत

शाहूनगरातील चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

पँटच्या खिशातून १२ हजार ५०० रुपये लंपास; तीन संशयित ताब्यात, १२ हजारांची रोकड हस्तगत

जळगाव, दि. २९ (प्रतिनिधी) : शाहूनगरातील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात पँटच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरणाऱ्या तिघांना जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या पाच तासांत जेरबंद केले. त्यांच्याकडून १२ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ४.३० वाजेच्या दरम्यान शाहूनगर येथील शाहू कॉम्प्लेक्समध्ये ही चोरी झाली. अनिल राजमल कासट (वय ६२, रा. एमआयडीसी, म्हाडा कॉलनी, जळगाव) यांच्या पँटच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी १२ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून सराईत गुन्हेगार शहीदखान नजीरखान (वय २७), समीर खान मजीदखान (वय ३७) तसेच १६ वर्षीय विधी संघर्षित बालक यांचा चोरीत सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर गुन्हे शोध पथकाने गेंदालाल मिल परिसरात शोधमोहीम राबवून तिघांना एका दुकानाजवळ ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी रोकड चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत आरोपींकडून १२ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गुन्हे शोध पथकातील जीपीएसआय सुनील पाटील, सफौ दीपक शिरसाट, पोहेकॉ नंदलाल पाटील, भगवान पाटील, उमेश भांडारकर, सतीश पाटील, वीरेंद्र शिंदे, योगेश पाटील, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणव पवार आणि भगवान मोरे यांनी ही कामगिरी केली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button