Politics

जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय?; साखर दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय?; साखर दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

१७ मजली प्रशासकीय इमारतीसमोर निषेध; बिना साखरेचा चहा तयार करून सरकारचा निषेध

जळगाव | प्रतिनिधी : महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेवर साखर दरवाढीचा अतिरिक्त बोजा टाकून सरकार कुठला विकास दाखवत आहे? असा संतप्त सवाल शिवसेना जळगाव महानगरच्या वतीने करण्यात आला. साखरेच्या दरवाढीविरोधात शिवसेनेने सोमवारी (दि. २४) १७ मजली प्रशासकीय इमारतीसमोर निषेध आंदोलन केले.

बिना साखरेचा चहा करून सरकारचा निषेध

जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील आणि महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या वतीने बिना साखरेचा चहा तयार करून शासनाच्या साखर दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिक आधीच महागाईच्या झळा सोसत आहेत. त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याने नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशा परिस्थितीत साखरेची दरवाढ म्हणजे जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार असून, महागाई वाढवून सरकार नेमका कुठला विकास साधत आहे, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

पदाधिकारी व शिवसैनिकांची मोठी उपस्थिती

आंदोलनाला शिवसेना मनपा गटनेत्या अर्शिन खाटीक, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख घुगे, महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, महिला आघाडी उपमहानगरप्रमुख नीता सांगोळे, माजी नगरसेविका पार्वता भील, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपमहानगरप्रमुख गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, भूषण जोशी, विभागप्रमुख किरण भावसार, शोएब खाटीक, कलीम खान, शरीफ रंगरेज, निलेश ठाकरे, अमित जगताप, बापू मेने, हर्षल मुंडे, तोसीफ काकर, संजय सांगोळे, सनी जैन, प्रफुल नाईक, प्रेमराज राठोड, योगेश पाटील, अशोक गिरणारे, किरण ठाकूर, प्रमोद सोनवणे, डॉ. रमाकांत कदम, अनिल राठोड, महेश शेरे, सावन राठोड, संकेत चव्हाण, ज्योती वंजारी, मनीषा कोळी, विजया पाटील, सुजाता पाटील आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button