Social

श्रीयंत्र, महाकाली देवी पूजनाचा श्री मंगळग्रह मंदिरात आध्यात्मिक सोहळा

श्रीयंत्र, महाकाली देवी पूजनाचा
श्री मंगळग्रह मंदिरात आध्यात्मिक सोहळा

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त सोमवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी कालभैरवी माता व श्री महाकाली देवी यांच्या मूर्तीवर व श्रीयंत्रावर कमला प्रयोग अभिषेक अर्चन करण्यात आले.

भगवान श्री कालभैरव व माता भैरवी यांच्या सान्निध्यात पार पडलेल्या या विधिवत धार्मिक यंत्रपूजनाला विशेष महत्त्व आहे. भारतीय उपासना परंपरेत श्रीयंत्र हे आदिशक्ती समृद्धीचे प्रतीक मानले जाते, तर श्री यंत्राचा संबंध देवीतत्त्व, ऊर्जा, साहस आणि आत्मविश्वासाशी जोडला जातो. या यंत्रांच्या अर्चनेतून मनःशांती, सकारात्मकता आणि आध्यात्मिक उन्नतीची प्रेरणा मिळावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर व पूजनाच्या माध्यमातून देवीशक्तीची आराधना करण्यात आली. महाकाली देवीच्या मूर्तीवर व श्री यंत्रावर कमला प्रयोग अभिषेक व अर्चन हा या धार्मिक सोहळ्याचा विशेष भाग ठरला. मंत्रोच्चार, पूजाविधी आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात विशेष आध्यात्मिक वातावरण वृद्धी झाली.
श्री. कपिल दलाल व त्यांच्या धर्मपत्नी सौ. प्रांजलताई दलाल पूजेचे मानकरी होते. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, यश जोशी व चंद्रकांत जोशी यांनी पौरोहित्य केले.
कालभैरवी माता नवरात्रोत्सवानिमित्त झालेला हा विशेष पूजन सोहळा यंत्रोपासना, देवी आराधना आणि भक्तांच्या श्रद्धेचा संगम ठरला.
यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला. दरम्यान नवरात्रोत्सवानिमित्त केलेल्या मनोहारी सजावटीचे अनेक भाविकांनी फोटो व रील काढले.

 

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button