OtherDetection

३६ तासात आरोपी निष्पन्न, पोलीस अधिक्षकांकडून मेहुणबारे पोलिसांचा सन्मान

महा पोलीस न्यूज । दि.२० जून २०२५ । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे यांच्यासह इतर अधिकारी व सहकाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठ आणि उत्कृष्ट सेवेने महाराष्ट्र पोलिस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते त्यांना विशेष प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

मेहुणबारे पो.स्टे.ला सी.सी.टी.एन.एस. गुरनं. 115/2025 नुसार भा.न्या.सं.क.331 (3), 331(4),3 05 अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात ३६ तासाच्या आत अज्ञात आरोपी निष्पन्न करुन आरोपीतांकडुन ३ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. कामगिरीची दखल घेत सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोहेकॉ किशोर पाटील, पोहेकॉ गोकुळ सोनवणे, पोहेकॉ शांताराम पवार आणि पोकॉ विनोद बेलदार यांना पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रशंसापत्र प्रदान करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

“आपले प्रशंसनीय कामाबद्दल अभिनंदन करीत आहोत. आपण केलेल्या सेवेचा महाराष्ट्र पोलीस दलाला अभिमान वाटतो. आपण भावी काळातही असेच उत्कृष्टपणे कर्तव्य बजावित राहाल व महाराष्ट्र पोलिस दलाच्या उज्ज्वल परंपरेत भर टाकाल, अशी आम्हाला खात्री आहे.” अशा आशयाचे सन्मानपत्र देत पथकाचा गौरव करण्यात आला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button