तरुणाच्या खुनाचा अवघ्या २ तासात छडा, अनैतिक संबंधातून केली हत्या
महा पोलीस न्यूज | २१ एप्रिल २०२४ | जळगाव शहरातील आव्हाणे रस्त्यावर असलेल्या लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्या लक्ष्मी जिनिंगमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा त्याच्याच मागील शेतात खून करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली होती. तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २ तासात छडा लावत गुन्हा उघड केला आहे. अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
आव्हाणे रस्त्यावर लक्ष्मण पाटील उर्फ लकी अण्णा यांच्या मालकीच्या लक्ष्मी जीनिंग मागील भरत खडके यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने खून सुरेश परमसिंग सोलंकी रा.सेंधवा, मध्यप्रदेश याचा खून करण्यात आल्याचे शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आले होते. घटनेची माहिती कळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा, श्वान पथक, ठसे तज्ञ आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.
घटनास्थळी मिळालेले काही सबळ पुरावे आणि परिसरात राहणारे कामगार आणि इतरांना विश्वासात घेत केलेल्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी मयताची ओळख पटवली. तसेच मयत सुरेश आणि रामलाल बारेला याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे व त्यांच्यात काही दिवसापूर्वी वाद झाल्याचे समजले होते. प्राप्त माहिती व इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी रामलाल बारेला याची पत्नी व रामलाल बारेला यांना तात्काळ ताब्यात घेतले.
पोलिसांनी बारकाईने तपास केला असता रामलाल बारेला याने त्याची पत्नी व मयत सुरेश परमसिंग सोलंकी यांच्यात असलेल्या अनैतिक संबंधाचा राग मनात धरून मयत सुरेश सोलंकी हा शेतात झोपलेल्या अवस्थेत असतांना कुऱ्हाडीने त्याच्या डोक्याच्या मागील भागावर वार करून त्यास जिवे ठार मारल्याबाबत कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्याची खबर मिळताच २ तासाच्या आत संशयीत आरोपी निष्पन्न करून त्याला गुन्हयात अटक करण्यात आली.
या पथकाने केली केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे किसन नजनपाटील, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा, स.पो.नि.अनंत अहिरे, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, विजय पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, अशोक पाटील तसेच जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे हवालदार चेतन पाटील, प्रविण पाटील, अनिल फेगडे, धनराज पाटील, नरेंद्र पाटील, प्रविण कोळी, तुषार जोशी, डॉग स्कॉड व फॉरेन्सिक पथक यांनी केली आहे.