अश्लील शिवीगाळ केल्याने युवतीने घेतला गळफास
महा पोलीस न्यूज | २४ फेब्रुवारी २०२४ | एरंडोल येथील भवानी नगर मधील रहिवासीनी भांडण करतांना खालच्या पातळीवर अश्लील शिवीगाळ केल्यामुळे प्रियंका शिंदे हिने बदनामी होईल या भितीने घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भवानी नगर मधील रहिवासी विठ्ठल रामभाऊ शिंदे हे कुटुंबासह राहत असून दि.२३ फेब्रुवारी रोजी रात्री घराच्या मागील गल्लीत भांडण्याच्या आवाज आल्याने काय झाले हे पहण्यासाठी त्यांची पत्नी गेली असता घरामागील गल्लीत राहणारे आनंद साधन निकम, उषाबाई साधन निकम, रामसिंग मान निकम, अमोल साधन निकम, साधन रामसिंग निकम हे दुर्गा शिंदे यांना जोरात शिवीगाळ करत होते. अमोल साधन निकम याने अत्यंत खालच्या शब्दात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हे ऐकून विठ्ठल शिंदे व त्यांचा मुलगा प्रकाश व मुलगी प्रियंका तिथे आले असता प्रियंकाला सुध्दा अश्लील शिवीगाळ केली व विठ्ठल शिंदे यांना हातपाय तोडून टाकेल अशी धमकी दिली. त्या रात्री जमलेल्या लोकांनी विठ्ठल शिंदे यांना व कुंटबास बाजूला करून घरी पाठवले.
दि.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी विठ्ठल शिंदे हे कामावर गेले व दुर्गा शिंदे ह्या कपडे धुण्यासाठी बाहेर गेल्या असताना व भाऊ बाहेर बसलेला होता. घरात कुणीही नसताना प्रियंका हिने गळफास घेतला. आई परतल्यावर प्रकाश घरात गेला असता समोरचे दृश्य पाहून आईला आरोळी मारली. त्यांची आरडाओरड ऐकून जमलेल्या लोकांनी तिला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
याप्रकरणी दुर्गा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आनंद साधन निकम, उषाबाई साधन निकम, रामसिंग मान निकम, अमोल साधन निकम, साधन रामसिंग निकम यांच्या विरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले अशी फिर्याद दाखल केली आहे. पूढील तपास पो.नि.सतीश गोराडे हे करीत आहे.