
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीची तयारी प्रशासन स्तरावर वेगाने सुरू झाली असून आज (मंगळवार) महापालिका सभागृहात नगरसेवक पदांवरील आरक्षण सोडत प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी एकूण १९ प्रभागांमधील ७५ नगरसेवक जागांचे प्रभागनिहाय व प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले.
प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार आहेत, त्यापैकी किमान एक जागा महिला राखीव ठेवण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागासवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुष आणि महिला यानुसार आरक्षणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न यामध्ये दिसून येतो.
प्रभागनिहाय आरक्षण तपशील
प्रभाग क्र.१
अनु. जाती महिला
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
प्रभाग क्र. २
अनु. जमाती
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
प्रभाग क्र.३
अनु. जाती महिला
अनु. जमाती महिला
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण
प्रभाग क्र.४
अनु. जाती महिला
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
प्रभाग क्र.५
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
प्रभाग क्र.६
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण
प्रभाग क्र.७
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण
प्रभाग क्र.८
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
प्रभाग क्र.९
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण
प्रभाग क्र.१०
अनु. जाती
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
प्रभाग क्र.११
अनु. जमाती महिला
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
प्रभाग क्र.१२
अनु. जाती
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
प्रभाग क्र.१३
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
प्रभाग क्र.१४
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
प्रभाग क्र.१५
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण
प्रभाग क्र.१६
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
प्रभाग क्र.१७
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण
प्रभाग क्र.१८
अनु. जमाती
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र.१९
नागरीकांचा मागासवर्ग महिला
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
राजकीय हालचालींना वेग
आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य परतले आहे. कोणत्या प्रभागात कोण उमेदवार पुढे येणार? पक्षांमध्ये तिकीट वाटप कसे होणार? यावरून गट-तट, पक्षांतर्गत चर्चा आता वाढण्याची शक्यता आहे. महिला उमेदवारांची संख्या यंदा लक्षणीय वाढण्याचे संकेत या आरक्षणातून मिळत आहेत.






