ब्रेकिंग : जळगाव एमआयडीसीत दोन कंपनीला भीषण आग

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगांव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या के सेक्टरमधील कंपनीला बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास लागलेली आग तीन तासानंतर देखील धुमसत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगांव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या के सेक्टरमधील साई किसान ठिबक कंपनीत ९ वाजेच्या सुमारास एका विद्युत ट्रांसफार्मरमध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. ट्रांसफार्मरजवळ असलेल्या ठिबक नळ्यांच्या बंडलला असलेल्या प्लास्टिक पॅकिंगमुळे आगीने लागलीच रौद्ररूप धारण केले.
आग लागताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, अग्निशमन बंब घटनास्थळी अर्ध्यतासाने दाखल झाल्याचे प्रत्यक्षदर्शी कामगाराने सांगितले. घटनास्थळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रांताधिकारी विनय गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, नायब तहसीलदार राहुल वाघ, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जळगाव शहर मनपा, जैन इरिगेशन, वरणगाव नगरपरिषद, भुसावळ नगरपालिका, नशिराबाद नगर परिषद, एरंडोल नगर परिषदेसह इतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास लागलेली आग तीन तासानंतर देखील धुमसत होती.
पहा संपूर्ण व्हिडिओ :




