वृक्षवल्ली आम्हा सोयरे, हे विश्वची माझे घर हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे उपदेश सोबत वाचले तर झाडे लावण्याची आवश्यकता का आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.” – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे, हे विश्वची माझे घर हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे उपदेश सोबत वाचले तर झाडे लावण्याची आवश्यकता का आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.” – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
जळगावमध्ये “एक पेड माँ के नाम 2.0” मोहिमेअंतर्गत २००० हून अधिक रोपे लावून मातृत्वाला आदरांजली!*
*जळगाव, महाराष्ट्र – ५ जुलै २०२५– पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड माँ के नाम” या दूरदृष्टीच्या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून, आज केंद्रीय राज्यमंत्री मा. श्रीमती. रक्षा निखिल खडसे यांच्या नेतृत्वात व मा. श्री. संजय सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे “एक पेड माँ के नाम 2.0” ही भव्य वृक्षारोपण मोहीम यशस्वीरित्या पार पडली.
याप्रसंगी मा. आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव), श्रीमती संगीता बियानी, डॉ. सचिन नांद्रे, श्री. अशोक कुमार (जिल्हा युवा अधिकारी, जळगाव), श्री.भूषण पाटील (जिल्हा युवा अधिकारी, नंदुरबार), श्री.सचिन पांझडे (गट विकास अधिकारी, भुसावळ), श्री.सुनील पंजे (लेखा आणि कार्यक्रम सहाय्यक, जळगाव), श्री.संदीप मोरे (सहायक प्रकल्प अधिकारी),श्री. भैया महाजन (सरपंच, चोरवड़), श्री.दीपक भोले, श्री.वीरेंद्र पाटील (ग्राम पंचायत सदस्य),श्री. रवि गुंजाल, श्री.मयूर मांढरे, श्री.मोहन चौधरी, श्री.विकास नावकर आणि श्री.राहुल पाटील (ग्राम सेवक, चोरवड़) यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, जिल्हा प्रशासन जळगाव आणि ‘मेरा युवा भारत’, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेचा उद्देश पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, आपली आई म्हणजेच धरती मातेचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक झाड लावण्याचे भावनिक आवाहन करणे हा होता. या उपक्रमाला विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सुमारे २००० हून अधिक रोपे लावण्यात आली. या रोपांमध्ये कडू बदाम, चिंच, कडुलिंब, आवळा, शिसम यांसारख्या वृक्षांचा समावेश होता. याशिवाय, विविध प्रकारच्या वनस्पती आणि जीवजंतूंना पोषक ठरणारी झाडेही लावण्यात आली.
‘’एक पेड माँ के नाम’ ही मोहीम आईच्या त्यागाचा आणि प्रेमाचा सन्मान करते. लावलेले प्रत्येक झाड हे आईच्या आठवणींना वाहिलेली आदरांजली आहे, कारण आईप्रमाणेच झाडे पर्यावरणाचे रक्षण करतात. आजच्या परिस्थितीत जळगाव जिल्ह्यात आवश्यकतेपेक्षा कमी वनक्षेत्र असल्याने मातीची धूप, घटलेली भूजल पातळी आणि वाढते तापमान यांसारख्या पर्यावरणीय समस्या भेडसावत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे ही समस्या अधिक गंभीर होत असून, अशा परिस्थितीत “एक पेड माँ के नाम” सारख्या मोहिमा जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास, जैवविविधतेला आधार देण्यास आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करून हवा शुद्ध करण्यास अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री श्रीमती. रक्षा निखिल खडसे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे, हे विश्वची माझे घर, हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे उपदेश आपण जर सोबत वाचले तर झाडे लावण्याची आवश्यकता का आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही.” त्यांनी पुढे आवाहन केले, “झाडे लावा, झाडे वाचवा! मानवी जीवन आनंदाने खुलवा!”
विविध महाविद्यालये आणि शाळांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकांनी या वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी त्यांची बांधिलकी दिसून आली. सहभागी संस्थांमध्ये भुसावळ येथील पी. ओ. नाहटा महाविद्यालय, पी. के, कोटेचा महिला महाविद्यालय, चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय, दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय, गोदावरी नर्सिंग कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळ, बियानी मिलिट्री स्कूल, आणि राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय यांचा समावेश होता.या तरुण स्वयंसेवकांच्या उपस्थितीने शाश्वत भविष्यासाठी सामूहिक प्रयत्नांना बळ मिळाले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाने ‘एक पेड माँ के नाम 2.0” या मोहिमेद्वारे निसर्ग, समाज आणि स्वतःप्रती असलेली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. विद्यार्थ्यानी सुमारे २००० हून अधिक झाडे लावून परिसराच्या हिरवळीत लक्षणीय भर घातली. निरंतर पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक सहभागाच्या मजबूत संदेशासह या कार्यक्रमाची सांगता झाली.
—————–
अधिक माहितीसाठी, श्री. माधव वणवे, विशेष कार्यकारी अधिकारी, युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालय राज्यमंत्र्यांचे कार्यालय यांच्याशी +919595878585 / madhav.wanave@gov.in यावर संपर्क साधावा.