Health

हरीविठ्ठल नगर येथे गणेशोत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचा ३०० रुग्णांनी घेतला लाभ

हरीविठ्ठल नगर येथे गणेशोत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचा ३०० रुग्णांनी घेतला लाभ
जळगाव, – विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभाग आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हरी विठ्ठल नगर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये जवळपास ३०० रुग्णांची जनरल तपासणी करण्यात आली. काही रुग्णांच्या पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून मदत केली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या शिबिरामध्ये विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सेवा प्रमुख डॉ. हितेंद्र गायकवाड आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख डॉ. सिद्धार्थ चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वरजी गर्गे, जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा, विभाग सहमंत्री देवेंद्रजी भावसार, जिल्हा सहसेवा प्रमुख दीपकजी दाभाडे, जिल्हा सहमंत्री राजेंद्र गांगुर्डे आणि संपर्कप्रमुख ललित खडके उपस्थित होते.

शहरातील शाहू हॉस्पिटलच्या डॉ. जागृती नारखेडे, नीलकमल हॉस्पिटलचे डॉ. यशवंत पाटील, खेलवाडे हॉस्पिटलच्या डॉ. वैशाली शिरसाठ तसेच त्यांची वैद्यकीय टीम या शिबिरात सहभागी झाली.

आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विठ्ठल नगरमधील नवनाथ मित्रमंडळातील दिनेश खारकर, दीपक हटकर, राजेश महाजन, गोपाल हटकर, योगेश अहिरे, ललित इंगळे, गणेश ठाकूर, राकेश कोळी, मुकेश ठाकरे, सागर कोळी, सोनू कोळी आणि साई मोरे यांनी परिश्रम घेतले

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button