महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटींची मदत जाहीर

महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटींची मदत जाहीर
मुंबई प्रतिनिधी I महाराष्ट्रात मे२०२५ पासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 31.64 लाख शेतकऱ्यांसाठी 2,215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. ही मदत खरीप 2025 साठी मंजूर झाली असून, 30 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मदत व पुनर्वसन विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये हिंगोली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश आहे.
जिल्हानिहाय मदत:
हिंगोली: 3.04 लाख शेतकरी, 2.71 लाख हेक्टर क्षेत्र बाधित, 231.18 कोटी रुपये.
बीड: 1.14 लाख शेतकरी, 56.74 कोटी रुपये.
धाराशिव: 2.34 लाख शेतकरी, 189.61 कोटी रुपये.
लातूर: 3.80 लाख शेतकरी, 2.35 कोटी रुपये.
नाशिक: 7,108 शेतकरी, 3.82 कोटी रुपये.
धुळे: 72 शेतकरी, 2 लाख रुपये.
नंदुरबार: 25 शेतकरी, 1 लाख रुपये.
जळगाव: 17,332 शेतकरी, 9.86 कोटी रुपये.
अहिल्यानगर: 140 शेतकरी, 6 लाख रुपये.
ही मदत जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही मदत पोहोचवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.






