जळगावात वाघ नगर परिसरात महिलेची आत्महत्या

जळगावात वाघ नगर परिसरात महिलेची आत्महत्या
जळगाव: शहरातील वाघ नगर परिसरात एका महिलेने घरात एकटी असताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२९ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडून हळहळ व्यक्त होत आहे.
चंद्रकला अरुण निकम (वय ३५, रा. नवजीवन कॉलनी, वाघ नगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुले आहेत. त्यांचे पती अरुण निकम हे सुतारकाम करतात, तर मुले शाळेत जातात.
शुक्रवारी सकाळी अरुण निकम नेहमीप्रमाणे कामावर गेले, तर मुले शाळेत गेली. याच वेळी घरात कोणी नसताना चंद्रकला यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. काही वेळाने शेजारील नागरिक त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता हा प्रकार उघडकीस आला.
ग्रामस्थांनी तातडीने त्यांच्या पतीला आणि पोलिसांना माहिती दिली. त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. यायाप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.






