हैद्राबाद येथे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडला ; ५६ बैलांची सुटका
४३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत ; यवतमाळ एलसीबीची कारवाई

हैद्राबाद येथे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडला ; ५६ बैलांची सुटका
४३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत ; यवतमाळ एलसीबीची कारवाई
यवतमाळ प्रतिनिधी I
गोहत्या आणि जनावरांच्या निर्दयी वाहतुकीस बंदी असताना जिल्ह्यात जनावरांची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे वारंवार उघडकीस येत असून २१ रोजी कत्तलीसाठी निर्दयीपणे ५६ बैलांना कोंबून अवैधपणे पांढरकवडा कडून हैद्राबाद कडे जाणारा ट्रक यवतमाळ एलसीबी आणि पांढरकवडा पोलिसांच्या पथकाने पथकाने पकडला असून ट्रकमध्ये अतिशय निर्दयीपणे ५६ गुरे कोंबण्यात आली होती . ट्रक चालक आणि अन्य दोन जण पसार झाले पोलिसांनी या गुरांची सुटका केली असून ४३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे . फरार झालेल्या तिघांविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांची दिलेल्या माहिती नुसार कत्तलीसाठी निर्दयीपणे बैलांना कोंबून अवैधपणे वाहून नेणारा ट्रक दिनांक २१ रोजी पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, पोहकों उल्हास कुरकूटे या गस्तीवर असतांना गोपनीय खबरी कडून माहीती मिळाली की, काही इसम नागुपर ते पांढरकवडा येणा-या राष्ट्रीय महामार्गावरून हैद्राबाद येथे एका ट्रक मध्ये गोवंशीय जनांवरांची कतली करीता तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नागपूर ते पांढरकवडा महामार्गावरील वाराकवठा गावाजवळ सापळा रचुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकला थांबवून ट्रकचालक आणि इतर दोन जण असे आरोपी पसार झाले. त्यांचा पाठलाग केला असता ते मिळून आले नाही . ट्रकची पाहणी केली असता ५६ जनावरे निर्दयीपाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली.
यामध्ये १३ लाख ६० हजार रुपये किमतीचे बैल आणि गोऱ्हे आणि ३० लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ४३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला . जनावरांना गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९८० कलम ११: (१), (घ), (ङ), (च), (ज), (ट) (८), (झ) महाराष्ट्र पाणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ कलम ५ (अ). (१). व५ (२) (ब) अन्वये गुन्हा गुन्हा करण्यात आलेला आहे.
हि कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक .डॉ. कुमार चिंथा , अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने, , स्थानीक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक, सतीश चावरे,यवतमाळ यांचे मार्गदर्शनात पीएसआय धनराज हाके,पोहेकॉ उल्हास कुरकुटे, निलेश निमकर, यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली.