वसुबारसला सोन्याच्या दरात झेप तर चांदीच्या दरवाढीस ब्रेक!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । दिवाळीचा सण रंगात आला असून उद्या धनत्रयोदशी निमित्ताने सुवर्ण खरेदीचा मुहूर्त लाभ घेण्यासाठी नागरिकांची तयारी सुरू झाली आहे. भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) दालनाच्या दरानुसार सोन्याच्या भावात मोठी वाढ तर चांदीच्या दरात घट झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चांदी सतत वाढीच्या मार्गावर होती, परंतु आज त्या वाढीला ब्रेक लागला आहे. दुसरीकडे, सोन्याने पुन्हा एकदा झेप घेतली असून २४ कॅरेट सोन्याने ₹१.३१ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
आजचे दर (BHANGALE GOLD – Jalgaon & Savda) :
- २२ कॅरेट सोने: ₹१,२०,००० प्रति तोळा
- २४ कॅरेट सोने: ₹१,३१,००० प्रति तोळा
- चांदी: ₹१,७५,००० प्रति किलो
(Rates may change during the day)
तज्ज्ञांच्या मते, धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन प्रमुख दिवस सोन्याच्या खरेदीसाठी शुभ मानले जातात. त्यामुळे उद्या खरेदीचा वेग वाढण्याची शक्यता असून बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी अपेक्षित आहे. चांदीच्या किंमतीत थोडीशी घसरण झाली असली तरी सणासुदीच्या काळात पुन्हा वाढ होऊ शकते.
जळगाव आणि सावदा येथील भंगाळे गोल्ड दालनांमध्ये दिवाळी निमित्त आकर्षक ऑफर्स, शुद्धतेची हमी आणि सवलतींच्या योजना सुरू आहेत. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून दालनात खरेदीसाठी चांगली गर्दी पाहायला मिळत आहे.



