
बुलढाणा जिल्हा नियोजन समिती बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची उपस्थिती
बुलढाणा प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समिती बैठक पालकमंत्री मकरंद लक्ष्मणराव पाटील यांच्या अध्यक्षतेत तसेच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा येथे झाली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी बैठकीस उपस्थित राहून रावेर लोकसभा क्षेत्रातील विविध विकास कामे व सुविधांबाबत आढावा घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांना योग्यत्या सूचना केल्या. तसेच नवनियुक्त पालकमंत्री मकरंद लक्ष्मणराव पाटील यांचे निवडीबाबत अभिनंदन करून, प्रस्तावित कामे लवकरात लाक्र मार्गी लावणे बाबत विनंती केली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासह पालकमंत्री श्री.मकरंद लक्ष्मणराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री श्री.प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती, आमदार सौ.श्वेता महाले पाटील, आमदार मनोज कायंदे, आमदार .सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी किरण पाटील, पोलीस अधीक्षक .विश्व पानसरे, अवर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार हे प्रमुख उपस्थितीत होते.