समाजासाठी केलेले योगदान हेच सर्वश्रेष्ठ दान – राजेंद्रसिंह राजपूत

जळगाव: अखिल भारतीय क्षत्रिय महासभेची जळगाव जिल्हा बैठक येथील राजपूत समाज उन्नती सभागृहात उत्साहात पार पडली. यावेळी बोलताना प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसिंह राजपूत यांनी समाजासाठी केलेल्या योगदानाचे कौतुक केले. “समाजासाठी दिलेले योगदान कधीही व्यर्थ जात नाही, समाज त्याची नक्कीच किंमत करतो,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रतापसिंहजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून झाली. या बैठकीत समाजाच्या प्रगतीसाठी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.
या बैठकीत संघटनेच्या विविध पदांवर नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसिंह राजपूत आणि पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
महाराष्ट्र इंजिनीअर प्रकोष्ट प्रदेश अध्यक्ष: डॉ. दीपकसिंग राजपूत , महाराष्ट्र कोषाध्यक्ष: सतीश गौर , महाराष्ट्र उद्योग अध्यक्ष: जीवनसिंग बायस , महाराष्ट्र महिला अध्यक्ष: तिलोत्तमा मौर्य राजपूत, महाराष्ट्र विधी अध्यक्ष: ॲड. अमोल परदेशी , महाराष्ट्र महिला सचिव: शालिनी पाटील, जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष: विद्या पाटील, जळगाव जिल्हा महिला उपाध्यक्ष: रोशना गिराशे , जळगाव जिल्हा महिला संघटक: इंदूबाई राजपूत, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष: पंकजसिंह बायस, धरणगाव युवक तालुका अध्यक्ष: मुकेशसिंग राजपूत,धरणगाव तालुका अध्यक्ष: मुकेशसिंग बायस, महिला प्रदेश संघटक: अनिता पाटील,जळगाव जिल्हा संघटक: विवेक पाटील, जळगाव जिल्हा सचिव: कमल पाटील,भडगाव तालुका अध्यक्ष: भरतसिंग पाटील पिंपळखेड विभागिय कार्यकारणीत सौ वर्षा राजपूत
,सौ छाया राजपूत ,सौ उषा परदेशी ,विजय गहेरवार ,प्रफुल चंदेल ,गोविंदसिंग जनकवर ,एड. रवींद्रसिंग पाटील , दिलीपसिंग पाटील
अमोल पाटील , प्रदीपसिंह गीराशे , अतुलसिंग राजपूत, अमरावती , जीवन सिसोदे , क्रांती पाटील व जळगाव जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
या नियुक्त्या जून २०२८ पर्यंत कायम राहणार असून, सर्व पदाधिकाऱ्यांनी सामाजिक काम करताना सर्वांना सोबत घेऊन काम करावे, असे आवाहन राजेंद्रसिंह राजपूत यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशना गिराशे यांनी केले, तर प्रास्ताविक शालिनी पाटील यांनी केले. डॉ. दीपकसिंग राजपूत, तिलोत्तमा मौर्य आणि जीवनसिंग बायस यांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाला यशस्वी करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.






