त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मुक्ताईनगर पत्रकार संघटनेककडुन निषेध!

त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मुक्ताईनगर पत्रकार संघटनेककडुन निषेध!
सुभाष धाडे I मुक्ताईनगर
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार बांधवांना स्थानिक गुंडांकडुन झालेल्या मारहाणी प्रकरणी मुक्ताईनगर तालुक इलेक्ट्रॉनिक मीडिया तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला तसेच संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागणीसाठी तहसीलदार मुक्ताईनगर व पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले.
त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळाच्या बाबतीत वार्तांकन करण्यासाठी गेले असता,
स्थानिक गाव गुंडाकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आली.
त्या अनुषंगाने त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे.
तसेच संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र पाहायला मिळत असून, आरोपींविरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी त्र्यंबकेश्वर येथे प्रवेश कर वसुली करणाऱ्या ए. एस. मल्टी सर्विसेस या कंपनीच्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. तसेच सदर कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून महाराष्ट्र राज्यात कुठेही कामाचा ठेका देऊ नये, अशी ठाम मागणी मुक्ताईनगर तालुका इलेक्ट्रॉनिक मिडिया पत्रकार संघटने तर्फे करण्यात आली.
नोव्हेंबर 2019 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्यानंतरही राज्यभरात 300 पेक्षा अधिक पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. यापैकी केवळ 43 प्रकरणांमध्येच पत्रकार संरक्षण कायद्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करताना शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. यासाठी गृहमंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्याची प्रकरणे तपासण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करावी, प्रलंबित प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणीही आज मुक्ताईनगर तालुका इलेक्ट्रॉनिक मिडिया पत्रकार संघटने तर्फे करण्यात आली.
यावेळी सचिन झनके,कैलास कोळी,विनायक वाडेकर,रवी गोरे,किरण पाटील,अतिक खान,अक्षय कोठाके,विठ्ठल धनगर, सुभाष धाडे,पंकज तायडे,सुमित बोदडे , मंगेश ढोले आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.






