ब्रेकिंग : अमळनेरला दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पंटर १२ हजाराची लाच घेताना जाळ्यात

महा पोलीस न्यूज । दि.२३ सप्टेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध गॅस रिफिलिंग सेंटर सुरू करण्यासाठी दोन पोलीस कर्मचारी आणि एका खाजगी पंटरने तब्बल १२ हजार रुपयांची लाच मागितली होती. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) याप्रकरणी कारवाई केली आहे. एका पान दुकानावर ही कारवाई करण्यात आली, जिथे लाचेची रक्कम ठेवण्यात आली होती. या घटनेमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात अवैध गॅस रिफिलिंग केंद्रांवर बंदी असताना, अमळनेर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी कायद्याची पायमल्ली करत एका व्यक्तीकडून अवैध गॅस भरणा केंद्र सुरू करण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणात एक खाजगी पंटर मध्यस्थ म्हणून कार्यरत होता. तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत तक्रार केली असता त्यांनी सापळा रचला.
पान टपरीवर ठेवली रक्कम
तक्रारदाराने पान दुकानावर लाचेची रक्कम ठेवताच, एसीबीच्या पथकाने तातडीने कारवाई केलीताब्यात घेतले. सध्या धुळे येथे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. धुळे एसीबीने या वृत्ताची पृष्टी केली असून याबाबत लवकरच अधिकृत माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे.
जळगाव पोलीस दलात खळबळ
या घटनेने जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. अमळनेरसारख्या संवेदनशील शहरात अगोदरच कायदा व सुव्यवस्था चिंतेचा विषय आहे, त्यात अशा घटना पोलीस दलावरील दबाव आणखी वाढवतात. सध्या धुळे येथे तपास सुरू आहे.
लवकरच आम्ही बातमी नावासह अपडेट करणार असून बातमी रिफ्रेश करावी…






