Social
गिरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

गिरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
चाळीसगाव : पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा आज (४ सप्टेंबर) रोजी ९६.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन दुपारी २ वाजता प्रकल्पाचे वक्रद्वार क्रमांक १ उघडून गिरणा नदीमध्ये ८१४ क्युसेक्स (२३.०३ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
गिरणा प्रकल्पातील पाण्याची आवक आणखी वाढल्यास विसर्गाचे प्रमाण वाढवण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिली.
दरम्यान, नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.






