Gold-Silver Rate

Gold-Silver Rate | आजचे सोने-चांदीचे दर जाहीर, चांदीत आणखी उसळी, सोने थोडे स्वस्त 

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील सुवर्णप्रेमी व गुंतवणूकदारांसाठी सप्ताहअखेरचे (शनिवार-रविवार) सोन्या-चांदीचे दर जाहीर झाले आहेत. जळगाव व सावदा येथील भंगाळे गोल्ड या नामांकित दालनातून मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांना शुद्ध सोन्याची हमी, आकर्षक दागिने आणि विश्वासार्ह सेवा सुरूच आहे.

आजच्या दरानुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,००,७६०, तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,१०,००० इतके आहे. दरम्यान, चांदीचा दर प्रति किलो ₹१,२९,५०० इतका झाला असून, सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या भावात वाढ नोंदवली गेली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोनं स्थिर राहिले असले तरी चांदीत झालेली मोठी उसळी गुंतवणूकदारांसाठी विशेष लक्षवेधी ठरत आहे. सोनं-चांदीच्या दरात होणाऱ्या सततच्या चढ-उतारामुळे ग्राहक बाजारपेठेकडे उत्सुकतेने पाहत असून, गुंतवणुकीचे नियोजन बदलत आहेत.

दररोज बदलणारे दर, आकर्षक डिझाईन्स, सर्वोत्तम ऑफर्स आणि पारदर्शक व्यवहार यामुळे जळगाव व सावदा येथील भंगाळे गोल्ड हे सुवर्णप्रेमींचे विश्वासाचे ठिकाण ठरत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button