Social
कजगाव गावाची गेल्या दोन दिवसापासून रात्रीची बत्ती गुल
रात्री अंधार असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण

कजगांव (निलेश patil) : कजगाव ता भडगाव येथे गेल्या दोन दिवसापासून रात्रीच्या एक वाजेपासून ते सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत गेल्या दोन दिवसापासून वीज पुरवठा खंडित राहत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे , विशेष वृद्ध व लहान मुलांसाठी परिस्थिती अत्यंत त्रासदायक ठरत आहे, रात्री एक वाजेपासून वीज नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार असल्याने सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे तसेच अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे बंद पडले आहेत, महावितरण ऑफिसचे मोबाईल व फोन देखील बंद करून ठेवलेले असतात तरी महावितरण चे स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे गांभीर्याने लक्ष नसल्याचे गेल्या दोन दिवसापासून दिसून येत आहे, यामुळे परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे तरी संबंधित अधिकाऱ्याने कजगाव गावाच्या समस्या कडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.






