ब्रेकिंग : जामनेरमध्ये तणाव, तरुणाची जमावाकडून हत्त्या!

महा पोलीस न्यूज । दि.११ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात एका धक्कादायक घटनेत एका २१ वर्षीय तरुणाची अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुलेमान रहीम खान (वय २१, रा.छोटा बेटावद, जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुलेमान खान हा आज दुपारी काही कामानिमित्त जामनेर शहरात आला होता. यावेळी शहरातील एका कॅफेमध्ये काही अज्ञात तरुणांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याच्या गावी, छोटी बेटावद येथे जाऊन पुन्हा मारहाण केली.
सुलेमानच्या आई-वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या मारहाणीत सुलेमानचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ जामनेर पोलीस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मारहाणीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र सूत्रांनुसार, काही तरुणांनी ही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यासमोर जमा झाला असून, पुढील तपास जामनेर पोलीस करत आहेत.
अधिक अपडेट आणि व्हिडिओ…






