गोदावरीच्या संस्थामध्ये शोकसभेचे आयोजन

गोदावरीच्या संस्थामध्ये शोकसभेचे आयोजन
जळगाव – गोदावरी संस्थेचा आधारवड श्रीमती गोदावरी पाटील यांचे ३ संप्टेबर रोजी दुखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील हॉलमध्ये शोकसभेत वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांचेसह प्राध्याक, डॉक्टर, कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. यावेळी श्लोकांच्या माध्यमातून स्व. गोदावरी आजींना वंदन करत डॉ. एन एस आर्विकर यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख केला तर डॉ. प्रशांत सोळंके यांनी वैद्यकिय परिसरासाठी गोदावरी आजींचे प्रेम शब्दातून व्यक्त केले. गोदावरी आजींचा जिवनप्रवास जवळून पाहीलेल्या प्रमोद भिरूड यांनी आठवणींना उजाळा दिला. यानंतर कर्मचा-यांसह श्रध्दांसुमनांनी स्व. आजींना श्रध्दाजली अर्पण केली.
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय,
येथे स्व. गोदावरी आई पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करतांना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्व. गोदावरी आईच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाचा उलगडा केला. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून आपली कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त केली.
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी,
येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धांजली अर्पण करताना उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आपली आदरांजली वाहिली.
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर
जळगाव येथे महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी गोदावरी आईंच्या कार्याचा व सामाजिक योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. श्रद्धांजली अर्पण करताना उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आपली आदरांजली वाहिली.






