प्रा. रविंद्र माळी पुरस्काराने गौरवान्वित

अमळनेर: “जागतिक फार्मासिस्ट दिवस ” 25 सप्टेंबर 2025 या दिवशी सोसायटी ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अॅन्ड रिसर्च (SSPR) कडून त्यांच्या 101 व्या इंटरनॅशनल वेबिनार मध्ये प्रा. रविंद्र गंगाराम माळी यांना 27 वर्षाच्या फार्मसी या क्षेत्रातील शैक्षणिक कार्य, प्रसिद्ध केलेली पुस्तके, संशोधन व माहितीप्रद शोधनिबंध, विविध राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रीय सेमिनार मधील सहभाग लक्षात घेऊ
SPSR EXCELLENCE AWARD 2025 प्रदान करण्यात आला.
नुकतेच प्रा. माळी हे श्री स्वामीनारायण विश्व मंगल गुरुकुल व स्वामी नारायण युनिव्हर्सिटी, कलोल, जि. गांधीनगर, गुजरात, संचलित फार्मसी महाविद्यालयात सेवारत झाले आहेत. त्यांच्या या गौरवपूर्ण पुरस्कार प्राप्ती साठी गुरुकुलचे व युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष स्वामी प्रेमस्वरूपदासजी, संत भक्त वत्सलजी, भक्ती नंदनजी, व सर्व गुरुकुल मधील संत, युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. रूपेश वसाणी, रजिस्ट्रार डाॅ. अजित गंगावने, विविध शाखेचे डिन, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारीवर्ग व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
क्षत्रिय कांच माळी समाज अमळनेर चे अध्यक्ष श्री. मनोहर महाजन, उपाध्यक्ष,सचिव, सर्व पंच मंडळ सदस्य, समाज बांधव व सर्व मित्र परिवार यांनी ही या यशाबद्दल प्रा. रविंद्र माळी यांचे अभिनंदन केले .
प्रा. रविंद्र माळी हे अमळनेर येथील प्रसिद्ध बी बियाणे व किटकनाशक औषध विक्रेते श्री. गंगाराम दोधू महाजन यांचे सुपुत्र आहेत.






