आठवे कुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कु. संस्कृती पवनीकर

जळगाव;- विवेकानंद प्रतिष्ठान द्वारा आयोजित 8 वे कुमार साहित्य संमेलनाची जळगाव तालुक्याची निवड फेरी डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात दिनांक 5 डिसेंबर 2024 वार गुरुवार रोजी संपन्न झाली. आठव्या कुमार साहित्य संमेलनाच्या प्राथमिक निवड फेरी दरम्यान 16 डिसेंबर 24 रोजी होणाऱ्या कुमार साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड करण्यात आली.
कुमार साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कु. संस्कृती पवनीकर ,स्वागताध्यक्ष कु. स्वरांगी कुळकर्णी, कार्याध्यक्ष चि. पियुष बालाजीवाले ,सदस्य कु. मुक्ता सोनवणे, चि. रोहीत पाटील,कु. गुणश्री पवार,कु .ग्रीष्मा रामकुवर ,कु. प्रेरणा वाघ,कु. आरुषी पाटील म्हणून निवड तज्ञ परीक्षक डॉ. लता दाभाडे,श्री दीपक पवार यांच्या मार्फत करण्यात आली.या प्रसंगी विवेकानंद प्रतिष्ठान व्यवस्थापक मंडळातील उपाध्यक्ष सौ हेमाताई अमळकर, सांस्कृतिक प्रमुख श्री किरण सोहळे, कार्यकारणी सदस्य डॉ वैजयंती पाध्ये, सौ कविता दीक्षित, क्षितिजा देशपांडे,शोभा ताई पाटील,स्निग्धा कुळकर्णी, डॉ महेंद्र शिरुडे उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रिया प्रमुख म्हणून सौ वैशाली पाटील ,श्री सचिन गायकवाड यांनी नियोजन केले.
आठव्या कुमार साहित्य संमेलनाच्या प्राथमिक निवड फेरी दरम्यान अभिवाचन,कथाकथन, काव्यवाचन, परिसंवाद या साहित्य प्रकारचे सादरीकरण जळगाव शहरातील सुमारे 23 शाळांमधील 578 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या साहित्य प्रकारासाठी काव्यवाचनासाठी परीक्षक सौ वैदेही नाखरे,अनुराधा धायबर, अभिवाचनासाठी परीक्षक श्री योगेश शुक्ल, विशाखा देशमुख,अनघा सागडे, कथाकथन साठी परीक्षक सौ श्रद्धा शुक्ल, सौ तारामती परदेशी परिसंवाद साठी परीक्षक प्रा. राजेंद्र देशमुख, प्रवीण पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. कुमार साहित्य संमेलनाच्या नोंदणी चे नियोजन तेजस्वी बाविस्कर, दीपिका चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ निलश्री सहजे ,सूत्रसंचालन व आभार प्रमोद इसे यांनी केले. कुमार साहित्य संमेलनाचे प्रसिद्धी प्रमुख श सचिन गायकवाड यांनी जबाबदारी सांभाळली तसेच संमेलन यशस्वी व्हावे यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली . विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी सकारात्मक असे वातावरण निर्मिती व्हावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संमेलनामध्ये सहभागी व्हावे यासाठी प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे. साहित्यात रुची असलेल्या साहित्यप्रेमींनी 16 डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी व्हावे. असे आवाहन विवेकानंद प्रतिष्ठान,जळगाव तर्फे करण्यात आले आहे.