विद्यार्थ्यांसाठी उत्तम पाऊल – उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ई-रिक्षा सेवेला प्रारंभ

विद्यार्थ्यांसाठी उत्तम पाऊल – उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ई-रिक्षा सेवेला प्रारंभ
जळगाव, दि. १४ (प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ई-रिक्षा सेवेला आज, दि. १४ जुलै रोजी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते औपचारिक प्रारंभ करण्यात आला.
या प्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य व वाहन समिती अध्यक्ष नितीन झाल्टे, प्रा. म.सु. पगारे, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, ॲड. अमोल पाटील, प्रा. महेंद्र रघुवंशी, प्रा. पवित्रा पाटील, डॉ. संदीप पाटील, राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, सीए रवींद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठातील मुख्य प्रवेशद्वार ते प्रशासकीय इमारत या मार्गावर विद्यार्थ्यांना अल्प दरात ई-रिक्षाद्वारे प्रवास करता येणार आहे. विद्यापीठ वाहन समितीच्या शिफारशीनुसार ही सुविधा सुरू करण्यात आली असून, सुरुवातीला दोन ई-रिक्षा खरेदी करून सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा मोठ्या प्रमाणात सोयीची, पर्यावरणपूरक व वेळ वाचवणारी ठरणार असून प्रशाळा, प्रशासन कार्यालये आणि विविध विभागांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे.
या उपक्रमावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी शरद पाटील, सहायक संजय पाटील तसेच विद्यापीठातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ही ई-रिक्षा सेवा विद्यापीठाच्या विद्यार्थीहिताच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक पाऊल असून भविष्यात अधिक सुविधा वाढवण्याचा मानस विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.