
महा पोलीस न्यूज । मिलिंद वाणी । फैजपूर-हंबर्डी रस्त्यावरील चोरवड गावाजवळ आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. प्रमोद लहानू रजाने यांच्या दुचाकीचा अपघात झाला आणि ते जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले. अपघातामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले पसरले. अशा कठीण त्याठिकाणाहून जात असलेले रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी दाखवलेली माणुसकी आणि तत्परता यामुळे त्यांनी सर्वांचे मन जिंकले.
फैजपूर-हंबर्डी रस्त्यावरील चोरवड गावाजवळ सकाळच्या सुमारास प्रवास करत असताना आमदार अमोल जावळे यांच्या नजरेस एक अपघात पडला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपली गाडी थांबवली आणि जखमी प्रमोद यांना धीर दिला. रुग्णवाहिकेची वाट न पाहता त्यांनी स्वतः पुढाकार घेत प्रमोद यांना आधार देत, त्यांना काळजीपूर्वक गाडीत बसवले आणि तातडीने फैजपूर येथील रुग्णालयात नेले. रुग्णालयातही त्यांनी डॉक्टरांशी सतत संपर्क ठेवून त्वरित उपचार मिळतील याची खात्री केली.
संकटात धावून जाणारच खरा आमदार
“आमदार असणे म्हणजे फक्त सभागृहात बोलणे नव्हे, तर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे,” असते. यावल रावेर विधानसभा मतदार संघाला असा आमदार लाभला असल्याचे यावेळी उपस्थित नागरिकांनी बोलून दाखवले. अमोल जावळे यांच्या या कृतीने प्रमोद यांच्या कुटुंबीयांना आणि स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला. या घटनेने आमदार अमोल जावळे यांनी केवळ एक नेता म्हणूनच नव्हे, तर एक माणूस म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संकटाच्या क्षणी सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा हा खरा जनसेवक आहे, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या माणुसकीच्या कृतीमुळे अनेकांचे हृदय भरून आले आहे






