लग्नसराईच्या मुहूर्तावर सोन्याचा दर खाली; चांदीही स्थिर पातळीवर

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । दिवाळी सणानंतर लग्नसराईच्या हंगामाला सुरुवात होत असताना, जळगाव जिल्ह्यात सोने-चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. जळगाव व सावदा येथील नामांकित भंगाळे गोल्ड दालनाने आजचे दर जाहीर केले असून, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्याच्या दरात किंचित घट तर चांदीचे दर जवळपास स्थिर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
💰 आजचे सोने-चांदीचे दर :
- २२ कॅरेट सोने : ₹१,०९,७३५ प्रति तोळा
- २४ कॅरेट सोने : ₹१,१९,८०० प्रति तोळा
- चांदी : ₹१,४९,००० प्रति किलो
(दर दिवसभरात बदलू शकतात)
सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत असले तरी सध्या सुरू असलेल्या स्थिरतेमुळे ग्राहकांसाठी खरेदीची योग्य संधी उपलब्ध झाली आहे. विशेषत: पुढील दोन आठवड्यांत लग्नसोहळ्यांची संख्या वाढणार असल्याने दागिने खरेदीमध्ये तेजी येण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.
भंगाळे गोल्ड हे जळगाव आणि सावदा येथील विश्वासार्ह, शुद्धतेची हमी असलेले सुवर्णदालन असून, पारंपरिक ते आधुनिक अशा विविध आकर्षक डिझाईन्समध्ये दागिन्यांची मोठी श्रेणी येथे उपलब्ध आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर खास ऑफर्स आणि सवलतींच्या योजनाही सुरू असल्याने ग्राहकांची विशेष गर्दी दिसत आहे.
तज्ज्ञांच्या मते, “सध्या दर तुलनेने स्थिर असल्याने गुंतवणूक आणि लग्नसराईसाठी खरेदी करण्यासाठी आजचा दिवस योग्य मानला जातो. मागणी वाढल्यास आगामी दिवसांत दर पुन्हा वाढू शकतात.”



